Home बीड मनसेत जोरदार इनकमिंग; बीडमध्ये अनेक युवकांच्या हाती मनसेचा झेंडा

मनसेत जोरदार इनकमिंग; बीडमध्ये अनेक युवकांच्या हाती मनसेचा झेंडा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षसंघटना अधिक बळकट करण्यावर अधिक भर दिला आहे.

मनसेचे विचार घराघरात पोहचले पाहिजे असा आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना दिले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने युवकांना पक्षात घेण्यास सुरूवात केली आहे. बीड येथे अनेक युवकांनी मनसेचा भगवा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : सांगली जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचं वर्चस्व; उपाध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला?

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बीड शहरातील अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम बदाडे पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या युवकांचे बदाडे पाटील यांनी स्वागत करत पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप-मनसे युतीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘दीड फूट’ उंची असणाऱ्या या पोपटाचा जन्मच ‘शिमग्याला’ झालाय; मेहबूब शेख यांचा निलेश राणेंवर हल्लाबोल

आगामी महापालिका निवडणुका आम्हीच जिंकणार; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास