Home महाराष्ट्र मनसेचा राजू शेट्टींना धक्का; स्वाभिमानीच्या तालुकाध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मनसेचा राजू शेट्टींना धक्का; स्वाभिमानीच्या तालुकाध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना धक्का दिला आहे. सांगली तालुकाध्यक्षाला गळाला लावत मनसेने शेट्टींना धक्का दिला आहे.

राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय माळी व ऋषिकेश जवळेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केला. याप्रसंगी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. तानाजी सावंत उपस्थित होते.

हे ही वाचा : भाजप नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते…; धनंजय मुंडेंचा पलटवार

दरम्यान, पक्षसंघटना वाढवण्याच्या उद्देशाने आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनसेकडून आंदोलने केली जात आहे. राज ठाकरे  यांनी शेतकऱ्यांबाबत भूमिका स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातही मनसेसोबत लोक जुळताना दिसत आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकित 64 टक्के मतदान; भाजप का काँग्रेस, मतदारांचा कौल कुणाला?

‘2024’च्या निवडणुकीमध्ये मी जिंकणार म्हणजे जिंकणारचं; निलेश राणेंनी फुंकलं रणशिंग

 राष्ट्रवादीनं प्रवेश केलेल्या ‘त्या’ 22 नगरसेवकांची यादी जाहीर करा; भाजपचं आव्हान