Home महाराष्ट्र ठाकरे गटाशी युती करण्याच्या चर्चेवर मनसे आमदाराचं मोठं विधान, म्हणाले, तुमच्यावर वेळ...

ठाकरे गटाशी युती करण्याच्या चर्चेवर मनसे आमदाराचं मोठं विधान, म्हणाले, तुमच्यावर वेळ आली म्हणून…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी केली, आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून युतीत प्रवेश केला. यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे.

अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. ही बॅनरबाजी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे. मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे. यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार देणार अजित पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

“मनसे नेते अभिजीत पानसे आणि संजय राऊत यांचे पहिल्यापासून चांगले संबंध आहेत. पानसे यांनी अलीकडेच ‘ठाकरे’ चित्रपट काढला होता. मला वाटतंय, आता नवीन एखादी स्क्रीप्ट आली असेल त्यामुळे ते संजय राऊतांशी चर्चा करण्यासाठी गेले असावेत., अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी यावेळी दिली.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होईल का? असं विचारलं असता राजू पाटील पुढे म्हणाले, “मला नाही वाटतं की युती होईल. कारण ही युती व्हावी, अशी मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्याची पण इच्छा असली पाहिजे., असं राजू पाटील यांनी म्हटलं. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटत आहे. त्यांच्याशी युती करायची माझी अजिबात इच्छा नाही. फक्त ते अडचणीत आहेत म्हणून आम्ही युती का करावी?” असा सवालही राजू पाटील यांनी यावेळी केला.

दरम्यान, आमचे नेते राजसाहेब अडचणीत असताना आणि त्यांच्या घरी कौटुंबीक प्रसंग घडला असताना तुम्ही (ठाकरे गट) आमचे नरसेवक फोडले. आता तुमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही युती करायची का? आम्ही आतापर्यंत कुणाशीही युती केली नाही. यापुढेही करू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझं हे मत मनसैनिक म्हणून आहे, मनसेचा नेता म्हणून नाही, असंही राजू पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“या चिमण्यांनो, परत फिरा रे…; ठाकरे गटाच्या आमदाराची, शिंदे गटाला माघारी फिरण्याची साद?”

मोठी बातमी! राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राहुल गांधीनी स्वत:हून घेतली शरद पवार यांची भेट

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शरद पवारांचं 3 शब्दात उत्तर, म्हणाले…