Home महाराष्ट्र “या चिमण्यांनो, परत फिरा रे…; ठाकरे गटाच्या आमदाराची, शिंदे गटाला माघारी फिरण्याची...

“या चिमण्यांनो, परत फिरा रे…; ठाकरे गटाच्या आमदाराची, शिंदे गटाला माघारी फिरण्याची साद?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी केली, आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून युतीत प्रवेश केला.

यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. यानंतर शिवसेनेच्या नेत्यांमधील धकधक सूरू असल्याची माहिकी समोर येत आहे. या सर्व प्रकरणावर आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राहुल गांधीनी स्वत:हून घेतली शरद पवार यांची भेट

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील करुन घेताना त्यांना मंत्रिपदं किती द्यायची, किती महामंडळं द्यायची, याच्या चर्चेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी त्यांना सामावून घेतलं की नाही? याबाबत माझ्या मनात शंका आहे. ते शपथ घ्यायला जात असताना एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र दिलं होतं का? ते सुद्धा बाहेर आलं पाहिजे, अशी मागणी भास्कर जाधव यांनी यावेळी केली.

“मी एवढंच सांगेन, शेवटी काल हे गेलेले लोकं एकेकाळचे आमचे सहकारी होते. आम्ही काही वर्ष एकमेकांबरोबर कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात नाही म्हटलं तरी सहानुभूती आहे. कोण परत येईल किंवा कोण परत येणार नाही, याबाबत बोलणार नाही. कारण तो माझा अधिकार नाही. पण एकदा कधीतरी आमच्यासारखे लोक शिवसेनेतून बाहेर पडलो होतो तेव्हा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या चिमन्यांनो परत फिरा रे असं आवाहन केलं होतं. मला शिवसेना प्रमुखांची आज आठवण येतेयं”, अशी आठवण भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितली.

महत्त्वाच्या घडामोडी –

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शरद पवारांचं 3 शब्दात उत्तर, म्हणाले…

मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?; मनसेच्या या नेत्याचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव

राष्ट्रवादीच्या फुटीवर अखेर शरद पवारांकडून शिक्कामोर्तब, म्हणाले…