आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मनसेने भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला होता. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना तुर्तास भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करु नका, अशी सूचना दिली आहे.
राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे.
मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही बाब राज ठाकरे यांच्या कानावर घातली होती. परंतु, राज ठाकरे सध्या अत्यंत सावधपणाने पावले टाकताना दिसत आहेत.
दरम्यान, पुण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबत राज ठाकरे यांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्यामुळे पुण्यातील मनसे-भाजप युतीचा मुद्दा सध्यापुरता निकालात निघाल्याचं मानलं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबई इंडियन्सचा जोरदार कमबॅक; पंजाबवर 6 विकेट्सनी विजय
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी घोटाळा करण्याची कला विकसित केली; किरीट सोमय्यांचा आरोप
जयंत पाटील आले, मात्र एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत; पंकजा मुंडेंची टीका
शिवसेना नेत्यांवरील ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही- सुधीर मुनगंटीवार