Home महाराष्ट्र मनसे महायुतीत सहभागी होणार का?; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

मनसे महायुतीत सहभागी होणार का?; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते, खासदार राहुल शेवाळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

ही बातमी पण वाचा : भाजपला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता ठाकरेंच्या वाटेवर?

मनसेच्या महायुतीमधील सहभागाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लवकरच निर्णय जाहीर करतील. मात्र, याआधीच आम्ही आमची शिवसेनेच्यावतीने भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही मनसेचे स्वागत करतो. कारण मनसे हा पक्ष शिवसेना पक्षाच्या विचारसरणीचा असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले आहेत.

हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यापूर्वीदेखील काम केलेले आहे. त्यामुळे मनसे महायुतीत आल्यानंतर निश्चित स्वरूपात आमची शक्ती, ताकद वाढेल, असंही राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा राजीनामा

गोपाळकृष्ण शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकशाहिर युवा प्रतिष्ठानकडून क्रिकेट स्पर्धा