नाशिक : मनसेनं पक्षाचा जुना ध्वज बदलून छ. शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला भगव्या रंगाचा नव्या ध्वजाचं अनावरण केलं, यावर रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेवर टिकास्त्र सोडलं आहे.
मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावं, असा सल्ला रामदास आठवले यांनी मनसेला दिलां आहे. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असं आठवले म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफी दिली आहे. ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळावा, अशी मागणीही आठवले यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी-
“शिवसेनेचे कडवे हिंदुत्व कायम राहील”
मनसेचा नवा ध्वज वादाच्या भोवऱ्यात; मराठा क्रांती मोर्चाचा नव्या ध्वजाला विरोध
‘हा’ मराठी अभिनेता म्हणतो… राज ठाकेर हे ‘जाणता राजा’
मनसेच्या झेंड्याचे स्वरुप स्पष्ट; आता राज ठाकरेही म्हणतात ‘हे भगवा रंग’