आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेनंही या नवीन सरकारला पाठिंबा दिला. तसेत विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केलं. त्यामुळे मनसे- भाजप युती होणार, या चर्चांनी जोर धरला होता. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
समोर जी परिस्थिती दिसून येईल तसा निर्णय घेऊ, असं सूचक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केलं. राज ठाकरे यांनी मनसेबाबत जी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याबाबत जनता योग्यच निर्णय घेईल. जनतेला काय स्वीकारार्ह आहे ते मतदानाच्या माध्यमातून उघड होईल. पक्ष विस्तारासाठी , पक्षाला ताकद देण्यासाठी राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे., असं बावनकुळे म्हणाले.
हे ही वाचा : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद…
राज ठाकरेंसोबत आमचे मधुर संबंध आहेत. व्यक्तिगत संबंधात राजकारण येत नाही. राज ठाकरेंना मी लवकरच भेटण्यासाठी जाणार आहे. प्रत्येक पक्षाची आपली स्वतःची भूमिका असते. राज ठाकरेंच्या भूमिकेवर राज्यातील जनता कसा प्रतिसाद देणार हे आम्ही आताच सांगू शकत नाही. मनसेला सोबत घेण्याबाबत आज कुठलेही विधान करू शकत नाही. जसजशी परिस्थिती निर्माण होईल त्यानुसार निर्णय घेतला जाऊ शकतो, असंही बावनकुळेंनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“बाळासाहेबांचे विचार हे राज ठाकरे पुढे नेऊ शकतात”
विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीनंतर अमोल मिटकरींचा महेश शिंदेंवर आरोप, म्हणाले…