Home महाराष्ट्र शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद…

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावना जाणून घेत आहेत. यावरून शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री पद आणि मंत्री पद घरातच ठेवलं ही शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी गद्दारी नव्हती का? शिवसेना प्रमुखांना तरी हे पटलं असतं का? छत्रपतींच्या घराण्याला तुम्ही वाकवण्याचा प्रयत्न केला, उमेदवार, उमेदवारीसाठी तुम्ही तानाजी छत्रपतींकडे करार पत्र मागित, ही गद्दारी नव्हती का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दाराआड दिलेला शब्द मोडणं याला काय म्हणतात? असा सवाल केसरकरांनी यावेळी आदित्य ठाकरेंना केला. तसेच गद्दारी शब्द आम्हाला वापरता तो तुम्हाला का वापरू नये?, असंही केसरकर म्हणाले.

हे ही वाचा : “बाळासाहेबांचे विचार हे राज ठाकरे पुढे नेऊ शकतात”

दरम्यान, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, ते शिव संपर्क मोहीम राबवत आहेत. छत्रपतींच्या नावाचा आधार केला जातो, पण इथे त्यांच्याकडूनच करारनामा मागितला गेला, असंही केसरकर म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीनंतर अमोल मिटकरींचा महेश शिंदेंवर आरोप, म्हणाले…

काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता शिवसेनेकडून राज्यसभा मिळवण्यासाठी इच्छुक होता; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

‘ ते’ पंतप्रधानाच्या शर्यतीत, पण भाजपने…; सभागृहात जयंत पाटलांची टोलेबाजी