Home महाराष्ट्र भाजपसोबत जायला नको, ही आमची स्पष्ट भूमिका होती – शरद पवार

भाजपसोबत जायला नको, ही आमची स्पष्ट भूमिका होती – शरद पवार

121

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात महत्त्वाची बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

माझ्याकडून कधीच बोलावलं गेलं नाही. मी पक्षाचा अध्यक्ष होतो. पक्षाच्या कोणत्याही सहकाऱ्याला कुठल्याही प्रश्नाच्या संबंधी माझ्याशी सुसंवाद ठेवायचा अधिकार होता. आमचे अनेक लोक वेगवेगळ्या विचारांचे होते. भाजपसोबत जाण्याच्या मागण्या झाल्या त्या संदर्भात चर्चा झाल्या नाहीत, असं मी म्हणत नाही. चर्चा झाली होती”, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : शरद पवार गट लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार! जयंत पाटील यांनी सांगितला आकडा

मी राजीनामा देतो याचं कारण काय? मी पक्षाचा अध्यक्ष होतो. सामूहिक निर्णय झाला होता. सामूहिक निर्णयानंतर काही वेगळं करण्याचं कारण नव्हतं. आमची स्वच्छ भूमिका होती की, भाजपसोबत जायला नको”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“लोकसभेच्या ‘या’ 4 जागा लढवणार!अजित पवारांची मोठी घोषणा

राजस्थानमध्ये काँग्रेसचं टेंशन वाढलं, भाजपला मिळणार ‘इतक्या’ जागा; जाणून घ्या एक्झिट पोलची आकडेवारी

संजय राऊतांची शिंदे – फडणवीसांवर टीका; म्हणाले,राज्यात नामर्दांचं सरकार…