मोठी बातमी! सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
142

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेट झाल्याची माहिती समोर आली असून या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीचा फोटोदेखील समोर आला आहे.

देशात लोकसभेची निवडणूक तोंडावर असून सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंची ताकद आहे. त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे या स्वत: आमदार आहेत. त्यामुळे ही भेट महत्वाची ठरणार असल्याचं बोललं जातंय.

ही बातमी पण वाचा : 15 दिवसात मोठे भूकंप, विश्वास बसणार नाही असे नेते भाजपमध्ये येणार; भाजप नेत्याचा दावा

दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांनीही एक मोठा गौप्यस्फोट केलाय. भाजपच्या एका बड्या नेत्याकडून आपल्याला पक्षप्रवेशाची ऑफर आल्याचा दावा सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. सुशीलकुमार शिंदे खरंच भाजपात जातात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

बाळासाहेब असते तर…; एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

काळाराम मंदिरातील स्वच्छता मोहिमेवरून राऊतांची टीका, म्हणाले…

राजकारणात मोठी खळबळ ; ‘या’ महिला नेत्याचा धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here