आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
आमच्याकडे एक तर असा पठ्ठ्या आहे. ऊठ दुपारी आणि घे सुपारी… ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात… पुढच्या निवडणुकीलाच येतात, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला होता. यावर आता मनसे नेते गजानन काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : शरद पवारांनी मदत केली नसती तर, आनंद दिघे हे कधीच…; जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान
महाराष्ट्रात वांद्रे मातोश्री येथे असा एक ‘सोंगाड्या’ आहे जो सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो… तरी बाईला कोण कधी उठतो व कधी झोपतो याचं जास्त पडलंय… वर्षभरात सोंगाड्याचा अनुभव आला की ‘गुळाची ढेप’ मातोश्रीचा अंधार सोडून दुसऱ्या कळपात दिसली तर नवल वाटायला नको, असा पलटवार गजानन काळेंनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजपाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?
चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकीनंतर भाजप आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा
“आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?”