Home देश “आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?”

“आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?”

294

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गांधीनगर : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने रेकॉर्डब्रेक यश मिळवलं. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरातमध्ये भाजपला जोरदार टक्कर देऊ शकेल, असं अनेक राजकीय जाणकार सांगत होते. मात्र त्यांचा हा अंदाज साफ चुकीचा ठरला.

गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजपला 156, काँग्रेसला 17 तर आम आदमी पक्षाला 5 जागांवर यश मिळालं. आता अशातच आम आदमी पक्षाचा आमदार हा भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा : शिंदे गट आणि भाजपामधील काही आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट 

विसवादर मतदारसंघातून भूपत भायानी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले, पण आता ते भाजपच्या वाटेवर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अशातच भायानी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसू शकतो.

महत्त्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणावर, आता चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…

“ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग सूरूच; आता ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

…तर शिवाजी महाराजांनी, अब्दुल सत्तारांचा कडेलोट केला असता; अमोल मिटकरींचा हल्लाबोल