Home पुणे चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकीनंतर भाजप आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकीनंतर भाजप आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

288

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना अनुदानासाठी सरकारवर अवलंबून का राहता? फुले आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरु केल्या  होत्या, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. काल त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आली. यावरून आता वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर भाजप आक्रमक झाली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजप नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हातात काळे पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला होता.

हे ही वाचा : “आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?”

पुण्यात आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपकडून पुन्हा एकदा विरोधकांना इशारा देण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर भ्याडपणे करण्यात आलेल्या शाईफेकीचा आम्ही निषेध करतो. हे अतिशय चुकीचं आहे. याचा निषेध व्हायला पाहिजे, मात्र महाविकास आघाडीकडून या गोष्टीचं चुकीच्या पद्धतीनं समर्थ केलं जात आहे. हे एक दिवस त्यांना भोवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपच्यावतीने देण्यात आला.

दरम्यान, या मोर्चात भाजप आमदार, शहराध्यक्ष आणि भाजपचे माजी महापौर सहभागी झाले होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

शिंदे गट आणि भाजपामधील काही आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट 

चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणावर, आता चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…

“ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग सूरूच; आता ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”