Home देश भाजपाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?

भाजपाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?

510

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बंगळुरू : माजी पंतप्रधान एच. डी. देवैगौडा यांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढलेले 15 नेते काँग्रेसमध्ये येणार आहेत. भाजपचे विधान परिषद सदस्य ए. एच. विश्वनाथ यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. अशी माहिती काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिली. ते सदाशिवनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास असणाऱ्यांनी आमच्या पक्षात यावे. आम्ही त्यांचे स्वागत करू. राजकारण हे साचलेले पाणी नसते, ते कायम प्रवाही असते. एखादा नेता खुर्ची सोडून गेला की त्या खुर्चीवर दुसरा व्यक्ती येत असतो, असे डी. के. शिवकुमार म्हणाले आहेत.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकीनंतर भाजप आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

भाजपच नाही तर धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून विधानसभा निवडणूक लढवलेले आणि पराभूत झालेले 15 नेतेही काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक आहेत. येत्या काळात अनेक धक्कादायक घडामोडी घडणार आहेत, असंही डी. के. शिवकुमार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिन्यातून दोनदा कर्नाटकातील निवडणुकांसाठी राज्यात येणार आहेत. ‘फक्त दोन दिवसांसाठीच का? त्यांनी तर कायम इथेच राहावे आणि प्रचार करावा. मोदी हे स्टार प्रचारक असून पदामुळे त्यांना आदर देऊया.’ असा टोलाही शिवकुमार यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?”

शिंदे गट आणि भाजपामधील काही आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट 

चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणावर, आता चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…