मुंबई : मोदी सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रवक्ते सचिन सांवत यांनी केला आहे. यासंबंधी सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.
102 व्या घटनादुरूस्तीनंतर फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात बेकायदेशीर आहे असे म्हणून मोदी सरकारने मराठा समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अगोदरच भाजपाचा रागरंग दिसला होता ज्यावेळी रविशंकर प्रसाद राज्य सरकारच्या बैठकीला अनुपस्थित राहिले., असं सचिन सावंत म्हणाले.
१०२ व्या घटनादुरूस्तीनंतर फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात बेकायदेशीर आहे असे म्हणून मोदी सरकारने मराठा समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अगोदरच भाजपाचा रागरंग दिसला होता ज्यावेळी @rsprasad राज्य सरकारच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. pic.twitter.com/XMHuwwP6XI
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 8, 2021
तसेच अॅटर्नी जनरलने राज्याच्या वकीलांची भेटही नाकारली. मविआ सरकारचे प्रयत्न मात्र यशस्वी झाले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी लढणाऱ्या सर्व राज्यांना नोटीस काढली व इंदिरा सहानी निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी मोठ्या घटनापीठाकडे सोपविण्याबाबत विचार केला जाईल., असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, यांचे अभिनंदन! मात्र मोदी सरकारच्या महाराष्ट्र विरोधी भूमिकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता उत्तर दिले पाहिजे. केंद्र सरकारचा संबंध नाही असे म्हणणाऱ्या महाराष्ट्रद्रोही भाजपा चा जाहीर निषेध!, असं म्हणत सचिन सावंतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे @OfficeofUT @AshokChavanINC यांचे अभिनंदन! मात्र
मोदी सरकारच्या महाराष्ट्र विरोधी भूमिकेवर @Dev_Fadnavis जी व @ChDadaPatil यांनी आता उत्तर दिले पाहिजे. केंद्र सरकारचा संबंध नाही असे म्हणणाऱ्या#महाराष्ट्रद्रोही_भाजपा चा जाहीर निषेध!— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 8, 2021
महत्वाच्या घडामोडी –
जणू काही सेहवागच डाव्या हाताने खेळत होता; इंझमाम उल हककडून ऋषभ पंतचं काैतुक
यालाच म्हणायचं चोराच्या उलट्या बोंबा; जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक दरात सवलत- उपमुख्यमंत्री अजित पवार
14 वर्षीय मुलावर महिलेनं केला बलात्कार; गरोदर राहिल्यानंतर झाला भांडाफोड