Home महाराष्ट्र मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही- छत्रपती संभाजीराजे

मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही- छत्रपती संभाजीराजे

165

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या असून त्यावर सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी झाली. यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. याबाबत सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकदिलाने काम करावं. सत्ताधारी पक्षाने मराठा समाजातील समन्वयकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा विश्वासात घेण्याची गरज आहे. आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही, असं संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान, तीन सदस्यीय खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारनं पाच न्यायाधीशांच्या खंठपीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली. तसंच व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे म्हणणं मांडण्यास अडचणी येत असल्याचं न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिलं. त्यानंतर सुनावणी होईपर्यंत नोकर भरती करु नये, असं सांगत न्यायालयानं याचिकांवर 1 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय सोमवारी दिला.

https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1628126697345543

महत्वाच्या घडामोडी-

… तरआम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार – चंद्रकांत पाटील

पोलिसांसाठी आनंदाची बातमी, सिडकोकडून पोलिसांसाठी ‘एवढ्या’ घरांची योजना; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

बोकडाच्या वाहतुकीवर आणि कुर्बानीसाठी कोणतीही बंदी असणार नाही- नवाब मलिक

“केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ‘इतक्या’ कोटींचा जीएसटी परतावा जाहीर”