Home महाराष्ट्र पोलिसांसाठी आनंदाची बातमी, सिडकोकडून पोलिसांसाठी ‘एवढ्या’ घरांची योजना; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पोलिसांसाठी आनंदाची बातमी, सिडकोकडून पोलिसांसाठी ‘एवढ्या’ घरांची योजना; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नवी मुंबई : पोलिस दिवस-रात्र आपल्या जीवाची आणि परिवाराची पर्वा न करता आपल्या संरक्षणार्थ उभे असतात. अशा पोलिसांना हक्काचे आणि स्वप्नातले घर सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

आज पोलिसांसाठी असलेल्या 4,466 घरांच्या योजनेचा शुभारंभ झाला. सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील 3,760 यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनमलाईन वाटप, तसेच व्हर्चुअल निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.

दरम्यान, सिडकोतर्फे सदनिकांच्या सोडतीतील विविध टप्प्यांत जसे व्हर्च्युअल निवारा केंद्र आणि ऑनलाईन माध्यमातून वाटपपत्र प्रदान करणे यांसारख्या प्रणाली आणि प्रक्रियांमधून उच्च दर्जाची पारदर्शकता राखण्यात येत आहे. ही पारदर्शकता अजोड असून अनुकरणीय आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बोकडाच्या वाहतुकीवर आणि कुर्बानीसाठी कोणतीही बंदी असणार नाही- नवाब मलिक

“केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ‘इतक्या’ कोटींचा जीएसटी परतावा जाहीर”

भाजपनं खरंच स्वबळावर लढून पाहावं; बाळासाहेब थोरातांचे फडणवीसांना आव्हान

“मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन?, आपलं जे मूळ असतं तिथून आपण दूर जात नाही”