Home पुणे …म्हणून मी अनिल देशमुखांचे आभार मानतो; नितीन गडकरींनी उधळली स्तुतीसुमने

…म्हणून मी अनिल देशमुखांचे आभार मानतो; नितीन गडकरींनी उधळली स्तुतीसुमने

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : नागपूर-काटोल चौपदरी रस्त्याचा काल शुभारंभ झाला. यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना या रस्त्याच्या कामासाठी आलेल्या अडचणी तसेच त्यातून निघलेले मार्ग याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

हे ही वाचा : “विधान परिषदेचे भाजपचे आमदार आर.एन.सिंह यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन”

वनविभागाने हा वाघांचा जाण्याचा मार्ग असल्यानं तिथून रस्ता करणे शक्य नाही., असं सांगितलं होतं. वास्तविक इतक्या वर्षात इथे कुठल्याही गावात वाघ शिरला नाही. मात्र, वाघाच्या अधिवासाचे कारण सांगत वन विभागाने मंजुरी देण्यास नकार दिला होता. मात्र यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मदत केली., असं गडकरी यांनी यावेळी म्हटलं. या रस्त्याचा कामासाठी अनिल देशमुख यांनी मदत केली म्हणून वन विभागाने या कामाला मंजुरी दिली. अन्यथा हे काम मार्गी लागले नसते., असं गडकरी म्हणाले.

दरम्यान, वाघाच्या अधिवासाचे कारण सांगत मंजुरी देण्यात येत नव्हती. तेंव्हा अनिल देशमुख यांनी मदत केली आणि वनविभागाची परवानगी या रस्त्याच्या कामासाठी मिळाली आणि म्हणून त्यांचे मी आभार मानतो, असं म्हणत नितीन गडकरी यांनी अनिल देशमुख यांचे आभार मानले.

महत्वाच्या घडामोडी – 

राष्ट्रवादीची भाजपच्या ‘या’ आमदाराला डायरेक्ट ऑफर?; चर्चांणा उधान

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; भाऊ धनंजय मुंडेंनी केला पंकजाताईंना मेसेज

“भाजपच्या ‘या’ आमदाराकडून अजित पवारांचं तोंडभरुन कौतुक”