अमित शहांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार जावं- नारायण राणे

0
392

सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग येथील मेडिकल काॅलेजचे उद्या 7 फेब्रुवारीला उद्घाटन आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या काॅलेजचं उद्या उद्घाटन होणार आहे. नारायण राणे यांनी स्वत: अमित शहांची प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देताच अमित शहा यांनीही राणेंच्या कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिला आहे. या कार्यक्रमापूर्वी राणेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यात असं सरकार (महाविकास आघाडी) असू नये. मी प्रार्थना करेन की, अमित शाह महाराष्ट्रात, सिंधुदुर्गमध्ये येताच महाविकास आघाडी सरकार जावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कर्तबगार लोकांचं इथल्या नागरिकांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारं सरकार यावं, असं म्हणत राणेंनी आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात”

बाळासाहेबांनी ज्यांचा सन्मान केला त्यांच्यावर शिंतोडे उडवून शिवसेनेचा महाराष्ट्रद्रोह- आशिष शेलार

राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर…; मनसेचा इशारा

सचिन तेंडूलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here