“दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, हे पवार साहेबांनी दाखवून दिलं”

0
465

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लावला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

2 वर्षापूर्वी शरद पवार साहेबांना ईडीची नोटीस आली आणि आजच्या दिवशीच ईडीला आव्हान देत मीच येतो असा इशारा पवारसाहेबांनी दिला आणि राज्य व देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते. या देशात सूडाचं राजकारण सुरू आहे हाच तो भाग होता. शरद पवारांचा त्या प्रकरणाशी संबंध नव्हता. जाणीवपूर्वक बदनामी करायची हे कुटील कारस्थान होते., असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

दिल्लीच्या तख्ताने पवारांना नमवण्याचा प्रयत्न केला परंतु दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले. ही घटना लोकांच्या मनावर खोलवर बसली की आज महाराष्ट्राच्या सत्तेत आपण आहोत’, याची आठवण जयंत पाटील यांनी यावेळी करुन दिली.

महत्वाच्या घडामोडी –

खडसे आणि महाजनांचं मन जुळले; याला शिवसेनेचेही साथ

पर्यटन विभागाचा मंत्री माझा मुलगा, आदित्य ठाकरेचा मला अभियान- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अभिनेते महेश मांजरेकरांच्या छगन भुजबळ लूकची जोरदार चर्चा, नेटकरी म्हणतात…

माझं पुढील लक्ष्य रश्मी वहिनी; किरीट सोमय्यांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here