आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हे भाजपमध्ये परतणार असल्याचा दावा केला होता. यावर आता एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट घेणार आहे, असं खडसे म्हणाले. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात मी देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली आहे, असंही खडसे म्हणाले. तसेच पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला कळवतो. मी त्यांना भेटणार आहे, असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी यावेळी दिलं.
हे ही वाचा : …म्हणून मी, दोन्ही दसरा मेळाव्याची भाषणं ऐकणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण
दरम्यान, गिरीश महाजन यांनी काल बोलताना, खडसेंबाबत 2 मोठे दावे केले होते. मी आणि देवेंद्रजी बसलो होतो. तिथे खडसे आले आणि त्यांनी म्हटलं की आपण तिघं बसू. जे काही आहे ते सगळं मिटवून टाकू… त्यांच्या मनात नेमकं काय आहे? हे स्पष्टपणे कळू शकलं नाही. कारण आम्ही बसलो तिथे खूप गर्दी होती. तिथं त्यांना विचारता आलं नाही की नेमकं काय मिटवायचंय ते?, असा पहिला मोठा दावा महाजनांनी यावेळी केला. तसेच एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले होते. ते अमित शहा यांच्या कार्यालयाबाहेर दीड तास बसून होते. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. शहा यांच्या कार्यालयातून मला फोन आला. त्यानंतर रक्षाताईंना मी फोन केला आणि विचारलं की काय झालं. त्यांनी सांगितलं की, आम्ही बराच वेळ वाट पाहिली पण भेट होऊ शकली नाही, असंही महाजन म्हणाले होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर शिवसेनेचं धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे; कायदेतज्ञ उज्वल निकम यांचं मोठं विधान