अमृता फडणवीस यांना आवरा; शिवसेनेचं भैय्याजी जोशी यांना पत्र

0
1012

मुंबई : राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आवरा, अशा आशयाचं पत्र शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक भैय्याजी जोशी यांना लिहिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची घमेंड आणि अतिआत्मविश्वास महाविकास आघाडी घडून येण्याचं खरं कारण आहे,  असं किशोर तिवारी यांनी पत्रातून म्हटलं आहे.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या पत्नींचं उदाहरण देत अमित शहा, नितीन गडकरी यांच्या पत्नी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना शिव्या देत नाहीत, असं तिवारी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं तुमचं आयुष्य आहे, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती; जितेंद्र आव्हाड आक्रमक

“सावरकर हे भाजपसाठी श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय”

..तर ते भ्रमात आहेत; शिवसेनेचा सामनातून भाजपवर निशाणा

आदित्य ठाकरेंनी केलेल्या टिकेवर अमृता फडणवीसांच प्रत्यृत्तर, म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here