मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलं. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिन असं म्हणत त्यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
नेहमी रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन आपण त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया असं म्हणत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी त्रिवार मुजरा केला.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी राज्य कारभार जगात आदर्श मानला जातो. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून पुढे जाऊ या. शिवप्रभुंनी दिलेला हा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आपण वचनबद्ध होऊ या. हे वचन त्यांच्या चरणी अर्पण करू या, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा! महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण म्हणजे #शिवराज्याभिषेक दिन.या दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 6, 2020
महत्वाच्या घडामोडी-
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबलं जातंय; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
छत्रपतींच्या विचारांना आदर्श मानून त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालण्याचा निर्धार करुया- अजित पवार
राहुल गांधींवर इतकी टीका का करता?; स्वरा भास्करचा सवाल
विराट-रोहितमध्ये कोण भारी; ब्रॅड हॉग म्हणतो…