मुंबई : सावरकरांचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. सावरकरांना भारतरत्न मिळावं म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करूया, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे
महापुरुषांच्या कामावरुन वाद निर्माण होऊ नये. सावरकरांचं अनेक क्षेत्रात योगदान आहे हे विसरुन चालणार नाही.यावरुन उगाच वाद निर्माण करु नये, असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
सावरकरांवरुन काही पक्ष वाद निर्माण करुन समाजात गैरसमज पसरवत आहेत, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.
दरम्यान, भाजपने विधानसभेत सावरकरांचा गौरव प्रस्ताव आणला होता. मात्र, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला आहे. त्यानंतर विधानसभेत भाजपने गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली गेली.
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेनेनं आपलं हिंदुत्व सोडलं आहे का?, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला सवाल
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा पलटवार, म्हणतात…
“उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून हेक्टरी आणि गुंठेवारीतील फरक समजून घ्यावा”
“हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, त्यामुळे शिवसेना-भाजपनं एकत्र यावं”