Home महाराष्ट्र सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, मी बघतो- देवेंद्र फडणवीस

सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, मी बघतो- देवेंद्र फडणवीस

पंढरपूर : सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, असं मोठं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो..पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे, असा हल्लाबोल फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी सरकारला हा इशारा दिला.

महत्वाच्या घडामोडी –

आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट; रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का?

“…तर तुम्हाला महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही”

महाराष्ट्रात लोकशाही नसून ‘लॉकशाही’ आहे; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

“जयंत पाटलांनी पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी”