आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : हिंदी सिनेमासृष्टीत अनेक चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते जावेद खान अमरोही यांचं आज मुंबईत निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जावेद खान अमरोही यांच्या एका जवळच्या व्यक्तीने यासंदर्भात टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत याबाबत माहिती दिली आहे.
हे ही वाचा : “ठाकरेंचा यशस्वी डाव; ‘या’ निवडणूकीत ठाकरेंचं वर्चस्व, भाजपला दिला पराभवाचा धक्का”
जावेद खान यांना श्वसनाचा त्रास होता. गेले वर्षभर ते अंथरूणाला खिळूनच होते. सांताक्रूझच्या सूर्या नर्सिंग होममध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाली होती.
दरम्यान, जावेद खान यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. जावेद खान यांनी ‘कुली नंबर 1’, ‘लगान’, ‘चक दे इंडिया’, ‘अंदाज अपना अपना’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
पहाटेच्या शपथविधीवरून, देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, शरद पवारांशी…
“Womens T-20 WC! मुंबईकर जेमिमाहची मॅच विनिंग खेळी, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय”