मास्तरांच्या मुलाने 1200 कोटीची संपत्ती जमवली, त्यांची कशी चाैकशी होत नाही?; एकनाथ खडसेंचा सवाल

0
524

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

ज्यांचे वडील मास्तर होते. त्यांनी हजार 1200 कोटींची संपत्ती जमवली. त्यांची चौकशी का होत नाही?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ईडीसंदर्भातही भाष्य केलं.

आता ईडीचा काहीही संबंध राहिला नसल्याचं खडसेंनी म्हटलं आहे. तसेच याबाबत न्यायालयात खटला दाखल केला असल्याचंही खडसेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“किरीट सोमय्यांची आता थेट विश्वास नांगरे पाटील यांच्याविरोधात तक्रार”

कार्यकर्त्यांचा अपमान मला मान्य नाही, काहीही अडचण आली तर मला फोन करा- जयंत पाटील

जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत, तोपर्यंत रस्ते सुधारणार नाहीत; अमित ठाकरे पुन्हा शिवसेनेवर बरसले

देवेंद्र फडणवीसांचं ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य सत्यात कधी येणार; जयंत पाटलांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here