Home महाराष्ट्र नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित; ‘या’ माजी आमदाराचा दावा

नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित; ‘या’ माजी आमदाराचा दावा

नंदुरबार : नवरात्रीच्या पहिल्या माळेला एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, असा दावा केलेले माजी आमदार आणि खडसे समर्थक उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.

मुंबईतून आनंदाची बातमी आणलीत का?” असा प्रश्न भाजप नेते एकनाथ खडसे यांना विचारला असता, त्यांनी शरद पवारांशी पॉझिटिव्ह चर्चा झाल्याचं सांगितलं आणि नवरात्रीच्या पहिल्या माळेला आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हणजे करणार असल्याचं म्हटलं आहे, अशी माहिती उदेसिंग पाडवी यांनी दिली आहे.

दरम्यान, मागच्या सोमवारी मी मुक्ताईनगरला गेलो होतो. त्यावेळी नुकतेच एकनाथ खडसे मुंबईहून परत आले होते. मुंबईला काय घडलं, याबाबत माझ्या मनात उत्सुकता होती. देशाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसेंची चर्चा होणार होती, याची मला पूर्ण कल्पना होती. त्या उत्सुकतेपोटी मी जळगावला गेलो, असं पाडवी यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

राज्यपालांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्रं लिहिलंय का?- बाळासाहेब थोरात

एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ; भाजप नेते गिरीश महाजन यांना धमकी

“…आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा”; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं- संभाजीराजे