ठाकरेंची इलेव्हन सेना दिवाळीपर्यंत तरूंगात जाईल,आव्हाड तुम्हीही बॅग तयार ठेवा; किरीट सोमय्यांचा इशारा

0
438

सांगली : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांबाबत खळबळजनक दावा केला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधलाय.

अनिल परब प्रकरण आता सुरु आहे, भावना गवळी पुढच्या आठवड्यात आणि जितेंद्र आव्हाड तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्हीही बॅग भरा, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना थेट इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इलेव्हन सेना दिवाळीपर्यंत तरूंगात जाईल, तसेच जितेंद्र आव्हाड तुम्ही आता बॅग भरा, असं म्हणत ठाकरे यांच्या इलेव्हन सेनेच्या भ्रष्टाचाराचे घोटोळे पुराव्यासह उघडकीस आणणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शेतकऱ्यांच्या बुडीत शेती कर्जमाफीचा निर्णय करा, केवळ ट्विट नको- राजू शेट्टी

‘बेळगाव तो सिर्फ झाँकी हैं, मुंबई अभी बाकी हैं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

“आज बेळगाव महापालिकेवर ‘भगवा’ फडकला, उद्या तोच ‘भगवा’ मुंबई महापालिकेवर फडकणारच”

पुणे हादरलं! 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून सामुहिक बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या 8 जणांना बेड्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here