जयदत्त क्षीरसागर अ‍ॅक्शन मोडमध्ये; राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते फोडले, ‘या’ दिवशी करणार शिवसेनेत प्रवेश

0
422

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : बीड नगरपालिकेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊ ठेपली आहे. अशातचं काका आणि पुतणे पुन्हा आमने- सामने आले असून काका पुन्हा एकदा पुतण्यावर कुरघोडी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या गटातील पाच नेते फोडण्यात यश मिळवलं आहे.

मागील दीड वर्षांपासून हे नगरसेवक अलिप्त होते. मात्र आता त्यांची भेट घेऊन जयदत्त क्षिरसागर यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचा मार्ग मोकळा केला आहे. येत्या 28 मार्च रोजी बीडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हे पाचही जण राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

हे ही वाचा : आमदारांना मोफत घरं देण्याच्या निर्णयावरुन मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

सोमवारी बीडमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात हे पाचही नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातोय.

महत्वाच्या घडामोडी –

जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी 

करुणा शर्मा -धनंजय मुंडेंची प्रेमकहाणी मराठीत येणार- करुणा शर्मा

‘…अन्यथा आम्ही ‘मातोश्री’वर मोर्चा काढू’ ; ब्राह्मण समाजाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here