Home महत्वाच्या बातम्या शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे; जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे; जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला यानंतर राज्यासह देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला. पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर आता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये उत्साह संचारला
आहे.

शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा…; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केलं. त्याचबरोबर देशभरातून आणि विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी आणि कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, असा आग्रह धरला, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

“देशातील आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची मागणी मान्य केल्याबद्दल शरद पवार यांचं मनपूर्वक आभार. त्यांची देश, महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला गरज आहे,” असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! बेळगावातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळली”

सांगली-कोल्हापूर महामार्गासाठी आता नवा ठेकेदार, महामार्गाचे काम युद्धीपातळीवर करणार; नितीन गडकरींचे आदेश

“कुणाला जायचंच असेल, तर थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; पत्रकार परिषदेत शरद पवारांचा रोख कुणाकडे?”