Home महाराष्ट्र कमळ फुलणार की धनुष्यबाण कमळाचा वेध घेणार हे निवडणूकीत कळेलच; किशोरी पेडणेकरांचं...

कमळ फुलणार की धनुष्यबाण कमळाचा वेध घेणार हे निवडणूकीत कळेलच; किशोरी पेडणेकरांचं भाजपला प्रत्युत्तर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करत महापालिकेवर भाजपचंच कमळ फुलवण्याचा संकल्प केल्याचं शेलार यांनी यावेळी सांगितलं. यावरून शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : औरंगाबाद पालिकेवरचा भगवा उतरू देणार नाही, लवकरच संभाजीनगरला येणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजपच्या बैठकीबाबत बोलताना भाजपला हा पोटशूळ नाही तर मूळव्याध झाला आहे. आगामी पाहिला निवडणुकीत कमळ फुलणार की कोमेजणार हे कळेल. प्रत्येक पक्षाला तयारी करण्याचा अधिकार आहे. महापालिका निवडणुकीत कमळ फुलणार की धनुष्यबाण कमळाचा वेध घेणार हे निवडणुकीनंतरच कळेल, असा टोला किशोरी पेडणेकरांनी आशिष शेलार व भाजपला यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही; धनंजय मुंडेंचा पलटवार

“राष्ट्रवादीची ताकद वाढणार; बार्शीचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?”

भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या ‘या’ स्टार प्रचारकाने केला भाजपमध्ये प्रवेश