देवेंद्र फडणवीसांबाबत असं बोलणं योग्य नाही- रोहित पवार

0
154

मुंबई : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. याची माहिती देत फडणवीस रुग्णालयात दाखल झाले होते. यावर, एका नेटकऱ्यानं फडणवीस बिहारच्या निकालामुळे नाटक करत असल्याचं ट्विट केलं होतं. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं. त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे. दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत,” असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, कोरोना वगैरे काही नाही, बिहार मध्ये बीजेपी 100% हरणार आहे हे त्यांना स्पष्ट दिसतंय आणि त्याचं खापर आपल्यावर फुटु नये म्हणून हे कोरोनाचं नाटक आहे. बाकी काही नाही, असं नेटकऱ्यानं म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई आणि महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कंगणावर हल्लाबोल

“पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत”

“विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण”

क्विंटन डीकाॅक-ईशान किशनची नाबाद मॅच विनिंग पार्टनरशिप; चेन्नईचा दारूण पराभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here