Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्याशी चर्चा करायला लाज वाटते का?; शिवसेनेचा विरोधी पक्षाला सवाल

मुख्यमंत्र्याशी चर्चा करायला लाज वाटते का?; शिवसेनेचा विरोधी पक्षाला सवाल

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये प्रदेश भाजपानं ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ हाती घेतलं आहे. या आंदोलनावरून शिवसेनेनं आता विरोधकांवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचव, असं सांगण्याची वेळ आली आहे, असं शिवसेनेचे मुखपत्र असेलेल्या सामनामधून म्हटलं आहे.

कोरोनाच्या निमित्तानं राज्यात नवे प्रश्न निर्माण झाले. राज्यपालांच्या ‘अंगणात’ लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्न घेऊन विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा केली पाहिजे. राज्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटत आहे की त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे?असा सवाल करत शिवसेनेनं भाजपावर हल्लाबोल केला.

दरम्यान, शिवसेनेनं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे-बोलावे. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण विरोधकांत शहाणपण उरले आहे काय?असा सवालही शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.

महत्वाच्या घडामोडी –

पुणेकरांना दिलासा…पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी!

सांगलीमध्ये आणखी तिघांना कोरोना…

एअरटेलचा नवीन प्लॅन लाँच; दिवसभरात वापरता येणार 50 GB डेटा

गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा…; प्रकाश आंबेडकरांच निलेश राणेंवर टीकास्त्र