Home पुणे पुणेकरांना दिलासा…पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी!

पुणेकरांना दिलासा…पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी!

पुणे : कोरोनाच्या युध्दामध्ये पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची आहे. कारण मुंबईनंतर आता पुण्यात देखील प्लाझ्मा थेरपीला यश मिळालं आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना पुण्यामधून मात्र एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

प्लाझ्मा थेरपीमुळे उच्च रक्तदाब आणि अतिस्थूलपणा असलेली कोरोनाबाधित व्यक्ती ठणठणीत बरी झाली आहे. 11 मे या दिवशी थेरपी केलेल्या रुग्णाला आता कोविड वॉर्डमधून हलवण्यात आले आहे, अशी आनंदाची वार्ता मुरलीधर मोहोळ यांनी दिली, यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय

कोरोनातून पूर्णपणे सावरलेला व्यक्ती त्याच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या पेशी तयार झालेल्या असतात त्या पेशी सध्या कोरोनाने ग्रासलेल्या रूग्णांच्या शरीरात टाकल्या जातात. त्यामुळे कोरोनाग्रस्ताची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते आणि याने कोरोनाबाधित लवकरात लवकर बरा होण्याची शक्यता अधिक असते, या सगळ्या प्रकाराला प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात. यामुळे कोरोनाला संपवण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही खूप उपयोगी ठरणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सांगलीमध्ये आणखी तिघांना कोरोना…

एअरटेलचा नवीन प्लॅन लाँच; दिवसभरात वापरता येणार 50 GB डेटा

गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा…; प्रकाश आंबेडकरांच निलेश राणेंवर टीकास्त्र

आपल्या बुडाखाली काय शिजतंय ते चंद्रकांत पाटलांनी पहावं- सतेज पाटील