Home महाराष्ट्र “जयंत पाटलांनी चंद्रकांत दादांवर टीका करण्यापेक्षा एवढ्या वर्षांच्या मंत्रीपदात काय दिवे लावले...

“जयंत पाटलांनी चंद्रकांत दादांवर टीका करण्यापेक्षा एवढ्या वर्षांच्या मंत्रीपदात काय दिवे लावले याचं उत्तर द्यावं”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : एका कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला होता. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

सत्ता गेल्यानंतर कुणाचा तोल जातो तर, कुणी भ्रमिष्ट होतं, यापैकी चंद्रकांत पाटलांचं नेमकं काय झालंय?, याचं संशोधन करावं लागेल, अशी टीका जयंत पाटलांनी केली., आता यावर भाजप प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या, मी तुम्हांला गाव जेवण देतो; चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना अनोखी ऑफर

चंद्रकांत पाटील हे एका मील कामगाराचे वारस आहेत. त्यांना सत्ता आली काय आणि गेली काय, फार काही फरक पडत नाही. जयंत पाटलांनी चंद्रकांत दादांवर टीका करण्यापेक्षा एवढ्या वर्षांच्या मंत्रीपदात जिल्ह्यासाठी काय दिवे लावले, याचे उत्तर द्यावे., असा पलटवार पृथ्वीराज पवार यांनी केला.

डोक्यात सत्तेची हवा आहे. त्यात जयंतराव आघाडीवर आहेत. महापालिकेतून नागरिकांनी त्यांचे पार्सल दोनवेळा अनवाणी पायाने परत पाठवले. आता सरळ सत्ता येत नाही म्हटल्यावर घोडेबाजार करून महापौर केला आहे. त्याची परतफेड व्याजासह होईल., असा इशाराही पृथ्वीराज पवार यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

आमचं ठरलंय, भाजपसोबत जायचं नाही; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान

पालघर निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार मैदानात?; मनसेची मोर्चेबांधणीला सुरूवात

महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता पश्चाताप होतोय; राजू शेट्टींचं मोठ वक्तव्य