Home महाराष्ट्र महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता पश्चाताप होतोय; राजू शेट्टींचं मोठ वक्तव्य

महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता पश्चाताप होतोय; राजू शेट्टींचं मोठ वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता पश्चाताप होतो आहे, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २० व्या ऊस परिषदेत बोलत होते.

महाविकास आघाडीने घरगुती वीज ग्राहकांना फसवल, पूरग्रस्त, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवल. सरकारमध्ये राहायच की नाही याचा विचार करावा लागेल. महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं का, याचा निर्णय लवकरच घेऊ. महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता पश्चाताप होतो आहे, आता कुणाला भेटायला जायची गरज नाही, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

हे ही वाचा : अजित पवारांना ईडीच्या छाप्यांनी फारसा फरक पडणार नाही- रामदास आठवले

ऊस उत्पादकांचे प्रश्न सुटत नाहीत असे सूचित करताना शेट्टी म्हणालेत ‘19 वर्षे याच मैदानात ऊस परिषदा घेतल्या आणि दर मागून घेतला. पहिल्या ऊस परिषदेला माझ्या डोक्यावर बँडेज आणि दाढी काळी होती. आता दाढी पांढरी झाली तरी प्रश्न तेच आहेत, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीचे सरकार आपण आणल. पावसात भिजत-भिजत हे सरकार आल. यांना महापुराची जाण असेल अस वाटल होत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होत की ‘माझ्यावर विश्वास ठेवा, फसवणार नाही.’ सरकारनं काय मदत केली हे गेल्या काही दिवसांत तुम्ही पाहिलच असेल. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरही अतिवृष्टीच संकट आल. पैसे नाही म्हणालात आणि सरकारी कर्मचाऱ्यांना 11 टक्के महागाई भत्ता दिला, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेसमध्ये नव्या नियुक्तींमुळे नाराजी; सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा तडकाफडकी राजीनामा”

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील हाॅटेल्स रात्री 12 पर्यंत, दुकाने रात्री 11 पर्यंत सुरू राहणार”

‘पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं चाहीए?, असं विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरून राऊतांचा टोला