Home महाराष्ट्र पालघर निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार मैदानात?; मनसेची मोर्चेबांधणीला सुरूवात

पालघर निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार मैदानात?; मनसेची मोर्चेबांधणीला सुरूवात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : संस्थांच्या निवडणुकीसह २०२४ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील प्रमुख पक्षांनी पक्ष संघटना मजबूत करताना दिसत आहे. अशातच  राज ठाकरे यांचे शिलेदार म्हणून ओळख असलेले मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पालघर मतदार संघाकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ते पालघरमधून उभे राहू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नुकताच झालेल्या पालघर जि. परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांच्यावर सोपवली होती. या निवडणुकीत त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यशही मिळाले आहे. या निवडणुकीत मनसेचा एक सदस्य जिल्हा परिषदेत पोहचला आहे. तर अविनाश जाधव यांचा संपर्क वाढत चालला आहे.

हे ही वाचा : महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता पश्चाताप होतोय; राजू शेट्टींचं मोठ वक्तव्य

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील अनेक युवकांना मनसेत घेऊन त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरूवातही केली आहे. ते युवकांमध्ये राज ठाकरेंचे विचार पटवून देण्यात यशस्वी ठरत आहेत. काल रोजी डहाणू तालुक्यातील वेती गावातील तरुणांनी मनसेत प्रवेश केला. तर यापूर्वीही पालघर जिल्ह्यातील अनेक युवक मनसेत दाखल झाले आहेत. अविनाश जाधव यांची ही संपूर्ण मोर्चेबांधणी लक्षात घेता, आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अजित पवारांना ईडीच्या छाप्यांनी फारसा फरक पडणार नाही- रामदास आठवले

“काँग्रेसमध्ये नव्या नियुक्तींमुळे नाराजी; सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा तडकाफडकी राजीनामा”

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील हाॅटेल्स रात्री 12 पर्यंत, दुकाने रात्री 11 पर्यंत सुरू राहणार”