Home क्रीडा भारताचा न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय ; मालिकेत 1-1अशी साधली बरोबरी

भारताचा न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय ; मालिकेत 1-1अशी साधली बरोबरी

191

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लखनऊ : भारत आणि न्यूझीलंड संघातील दुसरा टी-20 सामना लखनऊमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर 6 गडी राखून मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित 20 षटकांत 8 बाद 99 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 19.5 षटकांत 4 गडी गमावून 101धावा करत विजय मिळवला.

हे ही वाचा : भारताच्या मुलींनी रचला इतिहास; पहिल्याच टी20 विश्वचषकावर कोरले नाव

100 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाला शुबमन गिलच्या रुपाने पहिला धक्का बसला. शुबमन गिल 9 चेंडूत 11 धावा करुन झेलबाद झाला. त्याच्यानंतर इशान किशन देखील 32 चेंडूत 19 आणि राहुल त्रिपाठी 13 धावा करत बाद झाले. त्यानंतर कर्णधार आणि उपकर्णधाराने पाचव्या गड्यासाठी नाबाद 31 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधता आली.भारताकडून कर्णघार हार्दिक पांड्या 15 आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव 26 धावांवार नाबाद राहिले.

दरम्यान, न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना एम ब्रेसवेल आणि मार्क चॅपमनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या घडामोडी –

“भाजपकडून शिवसेनेला मोठं खिंडार; रायगडमधील तब्बल ‘इतके’ शिवसैनिक भाजपमध्ये करणार प्रवेश”

अमित ठाकरेंनी घेतली उदयनराजे भोसलेंची भेट

“उद्धव ठाकरेंच्या हृदयातून प्रेमाचे झरे वाहतात; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने उधळली स्तुतीसुमने”