Home क्रीडा भारताच्या मुलींनी रचला इतिहास; पहिल्याच टी20 विश्वचषकावर कोरले नाव

भारताच्या मुलींनी रचला इतिहास; पहिल्याच टी20 विश्वचषकावर कोरले नाव

186

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

डरबन : आयसीसीने पहिल्यांदा आयोजित केलेल्या महिला अंडर-19 T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडला हरवून इतिहास रचला.

पोचेफस्टूममध्ये रविवारी 29 जानेवारीला फायनलचा सामना झाला. भारताने इंग्लंडवर 7 विकेट राखून विजय मिळवत पहिल्यांदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवला. भारत महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा विश्वविजेता बनलाय.कॅप्टन शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या मुलींनी इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

हे ही वाचा : “भाजपकडून शिवसेनेला मोठं खिंडार; रायगडमधील तब्बल ‘इतके’ शिवसैनिक भाजपमध्ये करणार प्रवेश”

भारताची कॅप्टन शेफाली वर्माने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना 17.1 ओव्हरमध्ये इंग्लंड 68 रन्सवर ऑलआऊट झाली. इंग्लंडने 69 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात फार चांगली झाली नाही.

कॅप्टन शेफाली वर्मा आणि टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारी श्वेता सेहरावत फक्त 20 रन्समध्ये पॅव्हेलियनमध्ये परतल्या होत्या. त्यानंतर सौम्या तिवारी (24) आणि जी तृषा (24) यांनी डाव सावरला. दोघींनी 46 धावांची भागीदारी करुन विजय निश्चित केला. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असताना तृषा बाद झाली. सौम्याने विजय निश्चित केला. 14 व्या शेवटच्या चेंडूवर भारताने एक धाव घेऊन इतिहास रचला.

महत्त्वाच्या घडामोडी –

अमित ठाकरेंनी घेतली उदयनराजे भोसलेंची भेट

“उद्धव ठाकरेंच्या हृदयातून प्रेमाचे झरे वाहतात; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने उधळली स्तुतीसुमने”

“उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”