Home क्रीडा “कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीला भारतीय संघाची विजयी भेट, नामिबियाचा...

“कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीला भारतीय संघाची विजयी भेट, नामिबियाचा 9 विकेट्सने केला पराभव”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

आज भारत विरूद्ध नामिबिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने नामिबियाचा 9 विकेट्सने पराभव करत कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीला विजयी भेट दिली.

हे ही वाचा : “मनसेतून युवासेनेत प्रवेश केलेल्या नेत्यावर आदित्य ठाकरेंनी सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

भारताचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात 8 विकेट गमावत 132 धावा केल्या. नामिबियाकडून डेव्हिड विसाने सर्वाधिक 25 चेंडूत 26 धावांची खेळी केली. तर भारताकडून रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 3, तर जसप्रित बुमराने 2 विकेट घेतल्या.

दरम्यान, धावांचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 15.2 षटकात केवळ 1 विकेट गमावत पूर्ण केलं. भारताकडून के.एल.राहुलने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने 37 चेंडूत 56 धावा केल्या. तर नामिबियाकडून जे.फ्रायलिंकने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी –

‘या’ कामासाठी उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींना पाठिंबा; म्हणाले..”महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबत”

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपची माघार; बँक महाविकास आघाडीच्या हातात

…आता हे सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय; मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल