Home महाराष्ट्र ‘या’ कामासाठी उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींना पाठिंबा; म्हणाले..”महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबत”

‘या’ कामासाठी उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींना पाठिंबा; म्हणाले..”महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबत”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवारही व्हीसीच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मोठं आश्वासन दिलं आहे.

पालखी मार्गाचा विकास करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. नितीनजी आपण पुण्यकाम हाती घेतले आहे, आपण काही राज्य सरकारकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत . पालखी मार्गावरती असलेले सर्व अडथळे दूर करणं हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही कमी कोणत्याही पावलावर राहू देणार नाही. आम्ही तुमच्यासोबत राहू, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना दिले.

हे ही वाचा : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपची माघार; बँक महाविकास आघाडीच्या हातात

पालखी मार्गाचा विकास करणे ही प्रत्येकाचीच नैतिक जबाबदारी आहे. ऊन, वारा, पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता वारकरी वारी करतात. यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत आहे हे वचन मी या निमित्ताने देऊ इच्छितो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नितीन गडकरी यांनी वाखरी ते पंढरपूर हा महामार्गसुद्धा मोठा करण्याचा निर्णय घेतला. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. कारण सगळ्या नद्या तिकडे येतात आणि तिकडे मोठा भक्तिसागर होतो. पालखीचा थोडा अनुभव मी पायीसुद्धा घेतलेला आहे. यादरम्यान वारकरी देहभान विसरून पदयात्रा करतात . जिकडे-तिकडे पाण्याला खळखळाट असतो, पण या भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद असतो, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…आता हे सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय; मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

“अशोक चव्हाणांकडून भाजपच्या ‘या’ आमदाराला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, चर्चांना उधाण”

“अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष, आम्हांला गाडण्याची भाषा करू नका”