आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या दोघांमध्ये चांगलेच वाक् युद्ध रंगले आहे. वडवणी येथील प्रचार सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची खिल्ली उडवली होती. त्याला आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
2019 मध्ये तुम्ही महिला व बालविकास मंत्री होत्या, ग्रामविकास मंत्री होत्या, महाराष्ट्राच्या नेत्या होतात, तेव्हा विधानसभा निवडणुकीत परळीतील जनतेनी तुम्हाला तुमची औकात दाखवली आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. ते बीडमध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते.
हे ही वाचा : गुलाबराव म्हणाले, मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे; आता हेमा मालिनी म्हणतात…
उत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे 32 व्या क्रमांकावर आल्याने पंकजा मुंडे म्हणाल्या, तुमच्या ताई पहिल्या चार मंत्र्यांमध्येच होत्या. 32 व्या नंबरवर कधीही गेल्या नाहीत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरपंचायत निवडणुकीत पाच ठिकाणी निवडून दिलं तर 100 कोटी रुपयांचा निधी देऊ, असं आश्वासन दिलं होतं. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, पाच ठिकाणची आश्वासनं मिळून 500 कोटी रुपये निधी होतो. 500 कोटी रुपये आणण्याची यांची ताकद तरी आहे का? यावर माझी 500 कोटी रुपये आणण्याची औकात आहे, नगदी हिशेब देऊ का?’ असं म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; रोहित आर आर पाटलांचा विरोधकांवर घणाघात