Home महाराष्ट्र ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; रामदास आठवलेंची केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; रामदास आठवलेंची केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

मी अमित शाहांना एक पत्र लिहिणार आहे. त्यांना भेटणारही आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहे. विरोधकांना सातत्याने त्रास दिला जाणार असेल तर हे सरकार बरखास्त केलं पाहिजे. सरकार बरखास्त करण्याची वेळ नक्की येईल. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय.

हे ही वाचा : मोठी बातमी! बीडमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई पोलिसांनी नोंदवलेला जबाब आणि आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा, या पार्श्वभूमीवर भाजप चांगलीच आक्रमक झाली असून याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी ही मागणी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणा अन्…’- चंद्रशेखर बावनकुळे

देवेंद्र फडणवीसांनी नुरा कुस्ती खेळू नये, खऱ्या पैलवानासारखं मैदानात येऊन लढावं- प्रकाश आंबेडकर

प्रविण दरेकरांनी आपलं आडनाव बदलून दरोडेखोर ठेवावं; काँग्रेस नेत्याची खोचक टीका