Home देश पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल?; राहुल गांधींनी सर्वांची मनं जिंकणारं...

पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल?; राहुल गांधींनी सर्वांची मनं जिंकणारं दिलं उत्तर; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चेन्नई : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विझिटर्ससोबत दिवाळी साजरी केली.

राहुल गांधींनी या संभाषणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत ही दिवाळी छान साजरी झाल्याचं त्यांनी म्हटलं. याचवेळी संभाषणादरम्यान, पंतप्रधान झालात तर पहिला कोणता निर्णय घ्याल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. यावेळी राहुल गांधींनी सर्वांचं मन जिंकणारं उत्तर दिलं.

हे ही वाचा : “महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होणार?; उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक”

राहुल गांधींनी क्षणाचाही विलंब न लावता ‘महिलांना आरक्षण देईन’ असं उत्तर देत सर्वांचं मन जिंकलं. जर मला कोणी विचारले की तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवाल, तर मी विनम्रता शिकवेन. कारण विनम्रता ही अशी गोष्ट आहे की त्यामुळे तुम्हाला समज यायला मदत होते”, असंही राहुल गांधी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपा आमदार आणि राष्ट्रवादी नेत्यांची बंद दाराआड चर्चा; चर्चेला उधाण

इंधन कपातीवरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

…त्यामुळे राज्यातील भाजपाचे नेते महाराष्ट्रद्रोही आहेत; काँग्रेसची टीका