आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लंडन : आयपीएल 16 व्या मोसमानंतर आता संपूर्ण क्रिकेट प्रेमींचं लक्ष, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023 कडं लागलं आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या या महामुकाबल्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे आमनेसामने असणार आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील हा हायव्होल्टेज सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
लंडनमधील द केनिंग्टन ओव्हल इथं पावसाचं वातावरण आहे. वर्ल्ड वेदर ऑनलाईननं दिलेल्या माहितीनुसार, 7 ते 11 जून दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ही बातमी पण वाचा : कुस्तीपटूंना जर योग्य न्याय नाही मिळाला, तर…; राज ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र
सामन्यातील पहिले 3 दिवस साधारण पावसाचा अंदाज आहे. तर 10 आणि 11 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, जर पावसामुळे महाअंतिम सामना झाला नाही, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचा किंग कोण होईल, असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडला आहे.
दरम्यान, पावसामुळे सामना निकाली न निघाल्यास किंवा ड्राॅ झाल्यास, दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात येईल., असं आयसीसीने आधीच जाहीर केलं आहे. तसेच बक्षीसही दोन्ही संघाना समान दिलं जाईल. टेस्ट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला 13 कोटी तर उपविजेत्याला साडे सहा कोटी बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. तर सामना ड्रॉ राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी समसमान साडे सहा कोटी रुपये देण्यात येतील. तसेच खबरदारी म्हणून आयसीसीकडून 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल