Home महाराष्ट्र मराठा तरुणांना आरक्षण न मिळाल्यास टोकाचा संघर्ष करू- देवेंद्र फडणवीस

मराठा तरुणांना आरक्षण न मिळाल्यास टोकाचा संघर्ष करू- देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठा तरुणांना आरक्षण मिळायलाच हवं, ते न मिळाल्यास टोकाचा संघर्ष करू, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठा संघटनांच्या भेटीला आझाद मैदानात गेले होते, त्यावेळी ते बोलत होते.

मराठा आरक्षण उच्च न्यायालयात गेलं, तेव्हा केवळ दोन आरक्षणच टिकली, एक तामिळनाडूचं दुसरा मराठा आरक्षण आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात आमच्या सरकारच्या काळात प्रकरण गेलं, तेव्हा आम्ही तयारी केली, त्यावेळी सरन्यायाधीशांनी स्टे देण्यास नकार दिला. परंतु त्यानंतर त्याबाबतची सुनावणी या सरकारच्या काळात झाली. आ बैल मुझे मार असं झालं, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे”

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन भाजपने राजकारण केलं- अजित पवार

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला’; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला टोला

“गणपतीपुळे येथे समुद्रात बुडताना 2 पर्यटकांना वाचवलं”