Home महाराष्ट्र “उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे”

“उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे”

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतकडून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करण्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाष्य केलं.

अर्णब गोस्वामी असेल किंवा कंगना रणौत असेल. आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी रेकॉर्डवर सांगतोय की, आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच झाला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख कसाही केला तरी तो सक्षम आहे, असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन भाजपने राजकारण केलं- अजित पवार

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला’; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला टोला

“गणपतीपुळे येथे समुद्रात बुडताना 2 पर्यटकांना वाचवलं”

सामना आता जुना सामना राहिला नाही, असं म्हणत फेकुचंद पडळकर म्हणत टीका करणाऱ्या राऊतांना गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर