मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय…; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

0
233

पुणे : ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होतं. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा टोला लगावलाय.

“चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळय. अमकंय तमकंय… कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं. आपलं दुरून डोंगर साजरे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार! लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव…. कितीदा सांगायचं की हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही”, असा टोला अजित पवार यांनी यावेळी चंद्रकांत पाटलांना लगावलाय.

महत्वाच्या घडामोडी –

सरकार पडणं भाजपाच्या अजेंडाचं बायप्रॉडक्ट- देवेंद्र फडणवीस

बीडमधील मराठा मोर्चाला प्रशासनाची गरज नाही, मोर्चा निघणारच- विनायक मेटे

अनलॉकच्या गोंधळावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here